सेवा निवृत्ती सौ मंगला चौधरीं निवृत्त :


भुसावळ – येथील बालविकास प्रकल्प कार्यालयातील महिला कर्मचारी सौ मंगला अशोक चौधरीं या 27 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा करुंन 31 मार्च रोजी सेवा निवृत्त झाल्या .
प्रसंगी बालविकास प्रकल्प कार्यालयाचे वतीने त्यांनी केलेल्या कार्याचा यथोचित गुणगौरव करण्यात येवून सत्कार करुंन निरोप देण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ अनुपमा दुपारे होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री दवे यांनी तर आभार सुनील उबाळे यांनी मानले .
कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी रेखा गायकवाड़ , संरक्षण अधिकारी प्रतीक पाटिल , प्रसाद कोळी , सुनील उबाळे , शोभा जाधव , रोहिणी सोनवणे , संध्या रोझोतकर , सौ जयश्री दवे , यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमासाठी सर्व पर्यवेक्षिका व मुख्य सेविका उपस्थित होत्या .