भुसावळात भोर पंचायत लेवापाटील समाजाचा पुनर्विवाहेच्छुक ११ वा वधुवर मेळावा संपन्न ! उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – येथील भोर पंचायत लेवापाटील समाजातर्फे संतोषीमाता हॉल मध्ये साधारण पणे १००० लोकांच्या उपस्थितीत घटस्फोटित, विधवा, विधुर, शेतकरी, प्रौढ, व्यवसायीक, अपंग यांच्यासाठी भोर पंचायत लेवापाटील समाजाचा पुनर्विवाहेच्छुक ११ वा वधुवर मेळावा वधुवर परिचय मेळावा संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर कुटूंबनायक रमेश पाटील, भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, प्रो. चेअरमन आरती चौधरी, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे,माजी आमदार नीळू फालक, संचालक महेश फालक, सुहास चौधरी, शरद फेगडे, मंगला पाटील, दिगंबर महाजन, रघुनाथ चौधरी होते.
अँड. प्रकाश पाटील ह्यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सांगितले की गेल्या वर्षीच्या परिचय पुस्तिकेच्या माध्यमातून ४२ मुली व ४१ मुले यांचे विवाह जुळले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. भुसावळ शाखा नवनवीन उपक्रम घेत असते व त्यासाठी सर्व संचालकांचे सहकार्य मिळते असे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील यांनी सांगितले .
आरती चौधरी यांचा पुणे येथे, “मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा” या कार्यक्रमात राज्यस्तरीय “नारी रत्न” पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
नंतर आरती चौधरी यांनी उपस्थित मुलामुलींना पुनर्विवाहासाठी मानसिक तयारी कशी करायची यावर मार्गदर्शन केले. त्यात चुकुन लग्नाचा विवाहाचा वाईट अनुभव आल्यावर खचून न जाता दुसर्‍या विवाहाला सामोरे जा. तर
स्वाती भोळे यांनी सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.मानसिक तणावाचा शारीरिक काय परिणाम होतो सांगून स्वतः वर विश्वास ठेवून नविन जीवनाला सामोरे जा असे सांगून स्वतः वर विश्वास ठेवून नविन जीवनाला सामोरे जा असे आवाहन केेेले .तसेच
माजी आमदार निळकंठ फालक यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना भुसावळ शाखेने हा उपक्रम समाजहितासाठी सुरू केला होता व त्याचा समाजाला निश्चितच फायदा झाला आहे.
विष्णू भंगाळे यांनी भुसावळ शाखेचे कौतुक करून हा आदर्श इतरही शाखांनी ठेवून कार्य केले तर समाजातील बंधुभगगिनींना फायदा होईलच व प्रगती सुध्दा होईल.
यानंतर परिचय पुस्तिकेचे विमोचन केले.
ही परिचय पुस्तिका डॉ. बाळू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली गेली.
आ. संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुलामुलींना शिक्षणाबरोबर संस्कारही दिले तर घटस्फोटाचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
शेवटी अध्यक्षीय भाषणात कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांनी विचार व्यक्त केले त्यात ते म्हणाले की समाजात घटस्फोट होणे सोपे आहे पण पुनर्विवाह विशेषतः मुलांचे खूप कठीण झाले आहेत.
एकूण ३५ मुले व ५ मुलींनी आपला परिचय दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डाॅ. बाळू पाटील व पल्लवी ढाके यांनी केले. याप्रसंगी स्वाती भोळे यांनी सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जळगाव व पाडळसे येथून विष्णु भंगाळे अशोक चौधरी प्रदीप भोळे, नीला चौधरी. भुसावळचे मान्यवर
अरुण चौधरी, वासू इंगळे, सुधीर पाटील, दिनेश भंगाळे, देवा वाणी, विनित पाटील, राजेश चौधरी, श्याम भारंबे, मनोज जावळे, शालीनी पाटील, अर्चना पाटील, सुनंदा चौधरी स्वाती भोळे, कावेरी चौधरी
या प्रसंगी जळगाव जिल्हा, नाशिक, अकोला, पुणे, मुंबई, वापी, सुरत, आणंद, येथील लोकांची उपस्थिती होती .