वीस कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भुमीपुजन.

भुसावळ – भुसावळच्या हद्दीबाहेर व ग्रामपंचायतच्या अगदी बाहेरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या अनेक वर्षापासून भेडसावत होत्या.यासाठी २० कोटी ची भुसावळ ग्रामीण पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते कुदळ मारुन झाला.उद्योजक मनोज बियाणी,विणोद बियाणी,पियुष बियाणी,गोपाल ठाकूर,रमाकांत महाजन,देवा वाणी व तेथील रहिवासी उपस्थित होते.

शहरालगत असलेला भुसावळ नगर परिषदेच्या हद्दीत येत नसलेला व ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतही येत नसलेल्या भागाला अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्या भेडसावत होत्या यासाठी भुसावळ ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती 20 कोटी रुपयांची ही योजना नगर परिषदेचे हद्दीबाहेरील व ग्रामपंचायतीच्या बाहेरील वस्ती असलेल्या पुजा काॅम्लेक्स भाग,पांडुरंगनाथ नगर,आर एम एस कॉलनी, गुलमोहर प्रेस्टीज फेज ४, घोडेपीर बाबा जवळील कॉलनी इत्यादी संपुर्ण भुसावळ ग्रामीण भाग ( नगरपालिका मधील व ग्रामपंचायत मधील भाग सोडुन ) यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी योजनेचे भुमीपुजन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक मनोज बियाणी, विनोद बियाणी,पियुष बियाणी,गोपाल ठाकूर,रमाकांत महाजन,देवा वाणी व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भागांना पाणीपुरवठ्यासाठी पिंप्रीसेकम गावाकडील नदीमध्ये जॅकवेल ब्रिज व पंप हाऊस उभारण्यात येऊन अशुद्ध व शुद्ध पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येऊन ते पाणी तीन जलकुंभात आणून या भागांना पाणीपुरवठा करण्यात येईल.

यावेळी बोलताना आमदार संजय सावकारे म्हणाले की , नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या वस्त्या झालेल्या आहेत यांना पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होत असल्याने भुसावळ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या नागरिकांना एका वर्षाच्या आत पाणीपुरवठा सुरू होईल नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल.