वरणगाव – राजस्थान मधील मुकाम येथे तिसरे इंडियन टेक्नो फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन शाळांमधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या वतीने प्रतिनिधित्व केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांची चुणक दाखवत विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा कौतुक केले
अकरा व बारा फेब्रुवारीला राजस्थान मधील मुकाम येथे तिसरे इंडियन सायन्स टेक्नो फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 18 राज्यातील 250 विद्यार्थी व 75 शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये सायन्स मॉडेल प्रेझेंटेशन सायंटिस्ट कॅरेक्टर प्ले रोल सायन्स क्विझ व शिक्षकांसाठी इनोव्हेटिव्ह टीचर मॉडेल प्रेझेंटेशन पेपर प्रेझेंटेशन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स सायंटिस्टचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील व एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे व्हाईस चेअरमन सुनील वानखेडे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी विद्यालय वरणगाव एटी झांबरे विद्यालय जळगाव डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल सावदा या शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्राचा संघ तयार करण्यात आला होता. या स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी जुनियर गटातून महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी तोषल तेली व ए टी झांबरे विद्यालयाचा अर्णव पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला सायंटिस्ट कॅरेक्टर रोल या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावी सीनियर गटातून अथर्व ब्रह्मक्षत्रिय याने प्रथम क्रमांक तर याच गटात द्वितीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालयाचा पवन पाटील याने मिळविला पेपर प्रेझेंटेशन या गटात महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक सतीश मोरे डायमंड स्कूलचे शिक्षक शेख नदीम यांची शॉर्ट स्टोरी या गटातून प्रथम क्रमांक मिळविला महाराष्ट्रातून नॅशनल बेस्ट सायन्स टीचर अवार्ड पाचोरा येथील नवजीवन विद्यालयाचे शिक्षक रवींद्र चौधरी यांना देण्यात आला
या विद्यार्थ्यांना इस्रोचे माजी वैज्ञानिक तथा इंडियन प्लॅनेटोरियल सोसायटीचे अध्यक्ष वैज्ञानिक जे जे रावल वरीष्ठ वैज्ञानिक डॉ सी एम नॉटीयाल इस्रोचे माजी वैज्ञानिक डॉ दिलीप भट मॅथ गुरु बी एन राव रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉक्टर चंद्रमौलि जोशी जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्छाव आर एन टी इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर राकेश जानी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे नॅशनल डायरेक्टर गजेंद्र जेपाला आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मान पत्र स्मृति चिन्ह मेडल ने सन्मानित करण्यात आले

या स्पर्धेत परीक्षणाचे काम सर्वोदय हायस्कूल किहीं तालुका भुसावळ येथील सेवानिवृत्त पर्यवेक्षक डॉ पी एस कोळी यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून ए टी झांबरे विद्यालयाचे धीरज चौधरी डायमंड पब्लिक स्कूल सावदा चे रूपाली पद्मने स्वाती चौधरी यांनी मार्गदर्शन केले
राष्ट्रीय स्तरावर उंचावले ही अभिमानास्पद बाब
तिसरे इंडियन सायन्स टेक्नो फेस्टिवल 2023 मध्ये जिल्ह्यातील तीन विद्यालयातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्राच्या संघामध्ये समावेश करण्यात आला होता यामध्ये विविध स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले ही अभिमानास्पद बाब आहे
डॉ. नितीन बच्छाव शिक्षणाधिकारी जळगाव


