महाराष्ट्रातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणाधिकारी देणार भेट : जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर महाराष्ट्रचा झेंडा रोवला :


वरणगाव – राजस्थानमध्ये तिसरे इंडियन सायन्स टेक्नो फेस्टिवल 2023 चे आयोजन करण्यात आले आहे या फेस्टिवल मध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी झाले असून शनिवारी उद्घाटन समारंभामध्ये महाराष्ट्राचे लोक प्रतिभा सादर करून व्यासपीठावरून सर्वांची मने जिंकून घेतली तसेच धोतर कुर्ता व गांधी टोपी हा पारंपारिक वेश धारण करून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकून घेतले

11 व 12 फेब्रुवारी ला राजस्थानमधील मोकाम येथे तिसरे युनियन सायन्स टेक्नो फेस्टिवलची आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला यावेळी इंडियन प्लॅनेटोरियल सोसायटीचे अध्यक्ष तथा माझी वैज्ञानिक जे जे रावल वरीष्ठ वैज्ञानिक डॉ सी एम नॉटीयाल इस्रोचे माझी वैज्ञानिक डॉ दिलीप भट मॅथ गुरु बी एन राव रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉक्टर चंद्रमौलि जोशी यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते
या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय (वरणगाव) डायमंड स्कूल (सावदा) ए टी झांबरे विद्यालय (जळगाव) या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा धारण करून महाराष्ट्राचे परंपरा सादर केली त्यांचे कौतुक मान्यवरांनी केले यामध्ये तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
या कार्यक्रमात पाचोरा येथील नवजीवन विद्यालयाचे शिक्षक रवींद्र चौधरी यांना नॅशनल बेस्ट सायन्स टीचर अवार्डणे सन्मानित करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी संदेश दिला

शिक्षणाधिकारी करणार प्रोत्साहित
राज्यस्थान मध्ये सुरू असलेल्या इंडियन सायन्स टेक्नो फेस्टिवल ला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे निवड झाल्याने त्यांना प्रोसेस करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव सहभागी होणार आहे तसेच जळगाव जिल्ह्याचा महाराष्ट्राचे नाव देशभरात चमकवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत