भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नियोजन अभ्यास मंडळ अर्थशास्त्र विभाग आणि कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने नाहाटा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प 2023 कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस व्ही .पाटील अध्यक्ष उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून मा. प्राचार्य डॉ. मंगला जंगले उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक वसंत दगडू पाटील, सनदी लेखापाल माननीय श्री. दीपक मेहराणी उपस्थित होते.त्यांच्या समवेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नीलकंठ भंगाळे डॉ. ए.डी गोस्वामी, नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. एस.टी. धूम, प्रा. हेमलता कोटेच्या व्यासपीठावर उपस्थित होत्या.उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लाईव्ह अंदाजपत्रक दाखवण्यात आले. त्यानंतर लागलीच चर्चा कार्यक्रम घेण्यात आला.या चर्चेत अंदाजपत्रकात ठोक असे फारसे निर्णय घेण्यात आलेले नाही. संरक्षण खात्याचा विचार केलेला नाही.शेती,उद्योग,महिला,आरोग्य पर्यावरण, पायाभूत संरचना या बाबींचा विचार केला गेलेला आहे अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली .उत्पन्न कराच्या बाबतीत केंद्रीय अर्थसंकल्पात काही बदल केलेले नाही.उत्पन्न कराची मर्यादा वाढवलेली नाही,जी मर्यादा वाढवलेली आहे ती भाव वाढीच्या स्वरूपात खिशातून निघून जाईल अशी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. एकंदरीत अंदाजपत्रक चांगले आहे, वाईट आहे तर ते समाधानकारक आहे अशी चर्चा मान्यवरांनी यावेळी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. ए .सोळुंके यांनी केले प्रास्ताविक डॉ. एस.टी .धूम यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. किरण वारके यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ जे. एफ. पाटील,अर्थशास्त्र विभागातील डॉ. ललित तायडे, प्रा .जे. पी. आडोकार, प्रा. शितल सोनवणे, प्रा. नीता पाटील यांनी परिश्रम घेतले.



