भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराला जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, राजोरा येथे नुकतीच सुरूवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. उद्घाटक माजी सैनिक मुरलीधर तुळशीराम कोळी होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, उल्हास पाटील, राजोरा शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मधुकर नारखेडे, योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर सोनवणे, चेतन पाटील, सुवर्णा महाजन, रोहिणी बोरोले ,पोलीस पाटील मुक्ता गोसावी, सुभाष महाजन व ग्रामस्थ हजर होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.बी ढाके व सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व स्वयंसेवक मयूर महाजन यांनी तर आभार प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण यांनी मानले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रा.अनिल सावळे ‘बालविवाह कायदा’, प्रा.जी.पी वाघुळदे ‘पाणी व माती प्रदूषण’, प्रा.व.पु.होले ‘स्वच्छता आणि स्वयंसेवक जागृती’, डॉ.वृषाली चौधरी ‘विवाहपूर्वक समुपदेशन’, माजी प्राचार्य डॉ.जगदीश सूचक ‘आजादी का अमृत महोत्सव’, प्रा.प्रसाद खरे ‘पाणी व्यवस्थापन व काळाची गरज’, आरती चौधरी ‘बेटी बचाव बेटी पढाव’, दिनकर तायडे ‘एड्स जनजागृती’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर कुणाल मानकर, प्रीतम पाटील, गौरव कोळी हे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके घेणार आहेत. तसेच प्रा.डॉ.एन.एस.लांडगे ‘शाश्वत ग्रामविकास’, प्रा.डॉ.नरेंद्र दिनकर महाले ‘ग्रामीण विकासासाठी युवा जागृती’, प्रा.डॉ.दयाधन राणे ‘ग्रामीण विकास’ या ज्वलंत विषयावर मार्गदर्शन करतील. या शिवाय पथनाट्य प्रदर्शनी महिला मेळावा अंतर्गत हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून प्लास्टिक निर्मूलन, व्यसनमुक्ती जनजागृती या विषयावर गावात प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आर.बी ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश चौधरी व मयूर महाजन यांचे सहकार्य लाभत आहे.



