भुसावळ महसुल महिला कर्मचाऱ्यांची रात्रीची ड्युटी रद्द करा – शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांसह महिला आयोगाकडे तक्रार. तहसीलदार स्वतः फिल्डवर जात नाहीत – आरोप.

भुसावळ– भुसावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाहतुकीच्या तक्रारीमुळे माननीय तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात त्या त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडून प्रति महिना वीस वाहनांवर अवैधरित्या गौण खनिज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा करण्याचे इष्टांक त्यांना प्राप्त झालेला असून सदर कारवाई करण्यात बाबत भुसावळ तालुक्यातील डबर, वाळू, माती,मुरूम, या गुण खनिजाची वाहतूक व उत्खनन यावर प्रतिबंध करण्यासाठी रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत या वेळेमध्ये एक विविध कर्मचारी अधिकाऱ्यांचे पथकाची नेमणूक केलेली आहे. भुसावळ तहसीलदार यांनी जाणून-बुजून सदर तपासणी पथकामध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. नेमणूक केलेल्या पथकामध्ये ज्या महिला कर्मचारी कार्यरत आहे त्यांना दिवसभरामध्ये तहसील महसूल कार्यालयातील सर्व कामकाज सांभाळून पुन्हा रात्री आठ ते सकाळी वाजेपर्यंत या पथकात सेवा कर्तव्य करावे लागत आहे. एकीकडे शासन महिला सशक्तिकरण – सबलीकरण व भर देते आणि महिलांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षितता याबाबत शासन जन जागृती अभियान राबवत आहे.आणि एकीकडे त्यातच शासकिय महिला कर्मचाऱ्यांना हा एक मानसिक त्रास होत आहे. विशेष बाब म्हणजे भुसावळ तहसीलदारांनी या पथकामध्ये सामील असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे शासकीय वाहन व पोलीस संरक्षण पुरवलेले नाही. त्यामुळे या महिलांना स्वतः वैयक्तिक वाहनावर त्या ठिकाणी पथकामध्ये काम करावे लागत आहे. त्यामूळे या महिलांच्या सुरक्षितते वर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेबाबत च्या घटना समोर येताना आपण बघत आहोत.महा राष्ट्र शासनाने राज्य सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबवणे आणि सुट्टीच्या दिवशी बोलवणे शक्यतो टाळणे बाबत शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-1008 / 171 /प्र क्रमांक 12/ 0 8/ 18(र.व का ) 7 मार्च 2008रोजी एक परिपत्रक जारी केले आहे.त्यात शासकीय कर्मचाऱ्यांना विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयात उशिरा थांबवू नये आणि रविवार व सुट्ट्या दिवशी शक्यतो कामावर बोलवू नये यासंबंधी वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाला या परिपत्रकाला न जुमानता धुडकावून सर्रासपणे भुसावळ तहसीलदार यांनी या पथकांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची दिनांक 3/1/2023रोजी एक पत्रक काढून नेमणूक केली आहे. एक प्रकारे महिलांची पिळवणूक होत आहे. आणि म्हणून जिल्हा प्रशासन आणि भुसावळ तहसीलदार यांचे विरुद्ध भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी माननीय श्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केलेली आहे. भुसावळचे तहसीलदार स्वतः मात्र कधीही त्यांच्या कार्यक्षेत्र असलेल्या भुसावळ तालुक्यात फिल्डवर फिरत नाहित. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केलेला आहे. महिलांची नेमणूक रद्द न झाल्यास व अशा प्रकारे यापुढे महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची कार्यालयीन कामकाजाचे संबंधित सेवा करण्यास भाग पाडले किंवा सक्ती केली तर यापुढे राज्यातील आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये कळविले आहे.