हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन : भुसावळ शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांचा उपक्रम ;

भुसावळ – हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी आहे. त्यानिमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन दादासाहेब आर जी झांबरे माध्यमिक विद्यालय भुसावळ (भुसावळ हायस्कूल) या ठिकाणी करण्यात आल्याचे शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी एक गट आणि आठवी ते बारावी असा दुसरा गट करण्यात आले आहे. लहान गटाला वृक्षारोपण हा विषय व मोठ्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांची चित्रे रेखाटायची आहे स्पर्धकांना चित्रे काढण्यासाठी पेपर दिला जाईल , कलर व आवश्यक असलेली साहित्य स्पर्धकांनी सोबत आणायचे आहे दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

२३ जानेवारी रोजी सकाळी ११वाजता दादासाहेब आर जी झांबरे माध्यमिक विद्यालय भुसावळ (भुसावळ हायस्कूल) येथे स्पर्धा होणार आहे. बक्षीस वितरण शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, माजी आमदार दिलीप भोळे,शाळेचे मुख्याध्यापक कुमावत सर, शिवसेना पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील विद्यार्थ्यांनी जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आव्हान शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांनी यांनी केले आहे.