भुसावळातील शिवकॉलनीत पहिल्यांदाच सिमेंट काँग्रेसचे रोड : रहिवाश्यांनी केला आनंद व्यक्त :


भुसावळ – येथील जामनेर रोडवरील शिव कॉलनीत पहिल्यांदाच सिमेंट काँक्रेटचे रोड आमदार संजय सावकारे यांच्या फंडातून माजी नगरसेवक रमाकांत महाजन यांच्या माध्यमातून करण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षापासून शिवकालीतील रोड हे खराब झाले होते. शिव कॉलनी रोडावरून मोठमोठे ट्रक जात होते त्यामुळे शिव कॉलनीतील रहिवासी त्रस्त झाले असल्याने माजी नगरसेवक रमाकांत महाजन यांनी आमदार संजय सावकारे यांच्या आमदार फंडातून शिव कॉलनी वासियांसाठी शिव कॉलनीत सिमेंट काँक्रेटचे रोड तयार केले. शिव कॉलनीतील रोडवरून विकास कॉलनी, माऊली नगर, साकेत कॉलनी, पंढरीनाथ नगर, अमरनाथ नगर या भागात लोक वापर करत होते. त्यामुळे या रोळाची चाळण झाली असल्याने हे रोड ताबडतोब नवीन बनवण्यात आल्याने शिव कॉलनीतील रहिवासी आनंद व्यक्त करत आहेत.