भुसावळ – शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या वतीने शनिवार रोजी भुसावळ शहरांमध्ये विविध कार्यालयात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली
येत्या 23 जानेवारी ला वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने भुसावळ शहरातील शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय पोलीस स्टेशन एम एस सी बी ऑफिस शहर पोलीस स्टेशन व अन्य ऑफिसेस मध्ये भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना येत्या 23 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आणि कोणी हेतू पुरस्कार 23 तारखेला बाळासाहेबांची जयंती साजरी न केल्यास त्यांची रीतसर कंप्लेंट जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येईल असे सर्वांना सुचित करण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे शिवसेना शहर प्रमुख हेमंत विधानसभा संघटक बबलू बा-हाटे शिक्षक सेनेचे माजी जिल्हाप्रमुख विनोद गायकवाड उपशहर प्रमुख राकेश खरारे ,सोने ठाकूर ,शहर संघटक योगेश बागुल, विभाग प्रमुख पिंटू भोई ,शाखाप्रमुख संदीप पाटील, युवा सेना उपशहर प्रमुख चेतन भोई ,व शिवसैनिक उपस्थित होते



