भुसावळ – राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम (भुसावळ) मध्ये दि. 20/1/2023 शुक्रवार रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारोह मोठ्या

उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे मनोज बियाणी (अध्यक्ष ,राष्ट्रीय शिक्षा समिती), डॉ. संगीता बियाणी(सेक्रेटरी राष्ट्रीय शिक्षा समिती, भुसावळ, नूतन एच. फालक (प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली), हिरामन फालक.राजू पारिख, प्रवीण भराडिया सर,गोपाळ ठाकूर, डी.एम.पाटील,शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले.नूतन फालक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रसंगी संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना अधिक प्रगती करण्यासाठी मोलाचे,अनुभवाचे बोल दिले. सूत्रसंचालन अलिना खान यांनी केले. तर आभार रुद्रसेंन गंठीया सर यांनी केले.


