भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि १८ व दि १९ रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनीं खुप धमाल केेली

सकाळी प्रमुख पाहुणे भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी व्दीपप्रज्वलन करुन उदघाटन केले.
यावेळी डॉ.सुरज भोळे, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी,प्रिन्सिपल निना कटलर आदींची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनासाठी ताप्ती पब्लिक स्कूलचा परिसर पूर्ण उजाळून गेला होता यावेळी शाळेच्या इमारती सजवण्यात आल्या होत्या विविध प्रकारचे बॅनर्स व फलक तसेच झेंडे लावण्यात आले होते हे स्नेहसम्मेलनाचे विशेष आकर्षक होतं. सेल्फी पॉइंट लावण्यात आला होता.
प्रिन्सिपल नीना कटलर यांनी शाळेसंबंधी तसेच गुणवंत विद्यार्थ्यां बद्दल मनोगत केले व प्रमुख पाहुणे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता नर्सरी ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थांच्या स्नेहसम्मेलन कार्यक्रमात विदयाथ्र्यांनी धम्माल नृत्य सादर केल्याने ताप्ती पब्लीक स्कुल चा परीसर दणाणला होता.सर्वात प्रथम गणेश वंदना सादर करण्यात आली.
यावेळी विद्या यही उमर है बल्ले,भांगडा,कोळीगीत, पंजाबी सॉंग, इतनीसी हसी,साऊथ इंडीयन साँग,बुमरो बुमरो,टूकूर टूकूर देख टका टक, मार्या पिताचे,छोटीसी आशा,ब्राझिल, रासलीला, घुमर घुमर व अशा वेगवेगळ्या ४६ गाण्यांवर शाळेतील दीड हजार विद्यार्थांनी धम्माल केली. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक व संजय नाहाटा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन सोनाली मुजुमदार यांनी तर आभार प्रिंसीपल निना कटलर यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वर्ग व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


