जेसीआयचा भुसावळ ताप्तीचा पद ग्रहण संपन्न :


भुसावळ – जेसीआय भुसावळ ताप्ती चा पदग्रहण समारंभ नुकताच स्टार रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला.
जेसीआय भुसावळ ताप्ती चा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे तसेच जेसीआय चे झोन प्रेसिडेंट जितेंद्र बोरा व सेक्रेटरी कुशल झवर उपस्थित होते.
यावेळी मावळत्या अध्यक्षा ज्योती दरगड यांच्याकडून नूतन अध्यक्षा रजनी सावकारे यांनी पदभार स्वीकारला. तर सेक्रेटरी निशा मंडलेचा यांच्याकडून जयश्री अग्रवाल यांनी पदभार स्विकारला.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष रजनी सावकारे यांनी येणाऱ्या वर्षात विविध कामांची घोषणा केली.
यावेळी जेसीआयच्या झोन ऑफीसर संगीता अग्रवाल, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सचिव लता सोनवणे,मनिषा काकडे,सरला सावकारे,अनिता आंबेकर तसेच सुरत हून रजनी सावकारे यांचे वडील रामदास बावस्कर,डॉ रश्मी शर्मा,राजीव शर्मा, विकास पाचपांडे,इनर व्हील क्लब रेलसीटीच्या अध्यक्ष प्रतीक्षा पाटील,इनरव्हील ब्लॉसम च्या अध्यक्ष रितिका हेडा,रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या अध्यक्षा नूतन फालक,रत्नाकांता अग्रवाल, आदी मान्यवर व क्लब च्या सदस्या दिपा पटेल,मोनिका अग्रवाल,आभा दरगड, सुनिता अग्रवाल,हेमा बेहरा, वर्षा जैन,रिया छाबडा,प्रिया छाबडा,श्रृती लाहोटी,डॉ निलेश झवर,रूचा अग्रवाल, नम्रता चोरडीया,निकीता अग्रवाल,पल्लवी झोपे,सुनिता दरगड,दिपीका दरगड,रेखा व्यास,सुचित्रा अग्रवाल,योगीता झवर,विकास पाचपांडे,हिरामन फालक,अँड कल्पना टेमाणी,प्रतीक्षा पाटिल,मिनाक्षी धांडे,
सह महिला वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सोनल झवर यांनी तर आभार जयश्री अग्रवाल यांनी मानले.