भुसावळ – भुसावळ ते खंडवा दरम्यान गाडी क्रमांक 12149 मध्ये खंडवा येथील तिकीट तपासणीस यांनी एका महिलेचे हरवलेले पैसे परत करुंन कौतुकास्पद कारवाई केली .
दिनांक १३ रोजी गाडी क्रमांक 12149 मध्ये भुसावळ ते खंडवा दरम्यान खंडवा येथील तिकीट तपासणीस संजीव कुमार यांना A/2 कोचच्या गॅलरीमध्ये ४२०० रुपये सापडले.
संजीव कुमार यांनीं त्वरित सीओआर व्ही एस परिहार (सीटीआय/खंडवा) यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार दोघांनी A/2 कोचच्या प्रवाशांची चौकशी केली.
दरम्यान ते पैसे एका महिला प्रवाशी यांचे असल्याचे निदर्शनास आले ते पैसे महिलेने मागितलेअसता त्यांनी एकूण रकमेची चौकशी केली . रकमेची खात्री केल्यानंतर संजीव कुमार यांनी ती रक्कम प्रवासी महिला कांचन कुमारी F-24, कोच A/2, सीट नंबर 35
पीएनआर क्रमांक 8461162812 पुणे ते दानापुर असे तिकीट असलेल्या सदर महिलेची खात्री करुन
त्यांचेकडे ४२०० रुपये रक्कम सुपूर्द केली.
या कामगिरिचे सर्व तिकीट तपासणी स्टॉफने कौतुक केले आहे .



