भुसावळ – भुसावळ तालुका मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले येथील महालक्ष्मी नगर याठिकाणी राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या 425 वी जयंती निमित्त भुसावळ तालुका मराठा महिला मंडळ यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून व जिजाऊ वंदना म्हणुन विनम्र अभिवादन केले तसेच त्यांचे स्मरण करून त्यांचे जीवन चरित्र यावर मनोगत उपस्थितांनी मांडले यावेळी काही भगिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती.
आऊसाहेब राजमाता जिजाऊ या कणखर ,निडर, साहसी , अभ्यासू होत्या आजच्या महिलांनी त्यांचा आदर्श समोर ठेवावा असे मत श्रीमती अलकाताई भगत यांनी व्यक्त केले
राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना साहसा सोबतच नीती मूल्याचे धडे दिले स्त्रियांचा मान सन्मान, संत महात्मे यांचा आदर, प्राणीमात्रांवर प्रेम याची शिकवण दिली जे राज्य संस्कारशील राज्य असेल तेच खरे सुराज्य अशी भावना शिवरायांमध्ये रूजवली व आदर्श छत्रपती माँ साहेबांनी घडवले हाच आदर्श आताच्या मातांनी समोर ठेवत घरातुनच संस्कार मुलांना देणे गरजेचे आहे तसेच स्वराज्य टिकवायचे असेल व समाजाची प्रगती घडवुन आणायची असेल तर संघटीत होणे आवश्यक आहे असे मत ॲड. जास्वंदी भंडारी (पाटील) यावेळी व्यक्त केले
ललिता पाटील यांनी महिलांनीच महिलांची मदत करून त्यांना प्रत्येक कार्यास सहकार्य केले तर स्त्रियांची प्रगती कोणीही थांबू शकत नाही आजच्या स्त्रीयांनी राजमातांचा आदर्श ठेवणारी सक्षम नारी घडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे यावेळी म्हटले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. ममता पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ .प्रीती चौधरी यांनी मांनले. यावेळी विद्या पाटील, अर्चना पडघन, छाया पाटील, सोनाली भोसले ,छाया धोटे ,श्रद्धा पाटील ,पायल पाटील वैष्णवी धोटे ते व इतर सदस्य उपस्थित होत्या



