भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक भारताचे निर्माते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिवस (युवा दिन) साजरा करण्यात आला. ह्या अनुषंगाने भित्तिचित्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन तसेच प्रेरणादायी व्याख्यान असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मिनिस्ट्री ऑफ इनोवेशन काऊंसिल, इन्स्टिटयूशन इनोवेशन काऊंसिल व ए. आय. सी. टी. ई यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प समन्वयक म्हणून डॉ. पंकज भंगाळे यांनी तर सह- समन्वयक म्हणून प्रा. सचिन हरीमकर ह्यांनी जबाबदारी पार पाडली.
ह्या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी सुसंस्कृत आणि बलशाली देश व आधुनिक विचारांच्या समाजनिर्मितीचे तरूणांसामोर मोठे आव्हान असल्याचे सांगितले. तसेच तरुणांच्या माध्यमातून सशक्त आणि बलशाली भारत घडवण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार पथदर्शी ठरतील असे प्रतिपादन केले.
तंत्रविज्ञानाच्या प्रगतीचा अफाट वेग आणि भारतीय जीवनमूल्ये यांचा योग्य समतोल साधत देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी व वैज्ञानिक विचारबांधणी निर्माण होण्यासाठी भावी अभियंत्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची शिदोरी जवळ ठेवत वाटचाल केली पाहिजे असे आय. क्यु. ए. सी. व इन्स्टिटयूशन इनोवेशन काऊंसिल समन्वयक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून भावी युवा अभियंत्यांच्या सर्वकश जडणघडणीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रकल्प समन्वयक म्हणून डॉ. पंकज भंगाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, आय. क्यु. ए. सी. व इन्स्टिटयूशन इनोवेशन काऊंसिल समन्वयक डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा. ए. व्ही. पाटील, डॉ.एस. बी. ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ. अजित चौधरी, डॉ. डि. डि. पाटील, प्रा. डि. जी. अग्रवाल, प्रा. अनिकेत पाठक, प्रा. सचिन हरीमकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मांचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.



