फैजपुर – यावल तालुक्यातील फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयात 17 जानेवारी 2023, मंगळवार रोजी वेळ सकाळी 9 वाजेपासुन ते रात्री 9.30 वाजेपर्यंत होणार असुन तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन लेवा गणबोली साहित्य मंडळ व मधु स्नेह परिवार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे.

भुसावळचे लेवा गणबोलीचे उपासक व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व डॉ. मिलिंद धांडे हे वैद्यकीय क्षेत्रीय कार्यरत आहेत.सामाजिक-सांस्कृतिक चळवळीत निरंतर कार्य ते करीत असतात.त्यांची ही उपस्थिती आहे. डॉ.अ.कृ. नारखेडे , हे संमेलनाध्यक्ष आहेत मुख्य आयोजक कवी ,कलावंत ,प्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे ,स्वागताध्यक्ष मधूस्नेह परिवाराचे प्रमुख आ.शिरीषदादा चौधरी, कार्याध्यक्ष प्रभातदादा चौधरी ,लेवा गणबोलीचे मानबिंदू,इतिहासकार डॉ.नि.रा.पाटील आणि लेवा गणबोली साहित्य मंडळाचे पदाधिकारी व साहित्य प्रेमी उपस्थित राहणार आहे तरी
लेवा गणबोली साहित्यिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे


