वरणगाव – शिक्षणासाठी राज्य केंद्रीय व आंतरराष्ट्रीय असे विविध बोर्डाचा अभ्यासक्रम असून यामध्ये याची काठीण्य पातळी कमी अधिक आहे राज्य अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त सराव करून घेत त्यामधील संकल्पना स्पष्ट केल्या पाहिजे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागून सखोल अभ्यास करणे वरती विद्यार्थी भर देत असतात इयत्ता दहावी व बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी खालील इयत्तेतील पायाभूत गणित व विज्ञानाच्या संकल्प विद्यार्थ्यांच्या स्पष्ट असल्या पाहिजे असे प्रतिपादन सर्वोदय हायस्कूल किन्ही ता. भुसावळ येथील सेवानिवृत्त पर्यवेक्षक डॉ. पी एस कोळी यांनी केले

श्री र.न मेहता प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ येथे विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेच्या सुरुवातीला रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका रीता शर्मा एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे व्हाईस चेअरमन सुनील वानखेडे उषा नॅशनल टेक्नो रिसर्च सायन्स सेंटरचे चेअरमन जीवन महाजन संचालक तेजेंद्र महाजन यांनी गणिताच्या विविध क्लुप्त्या व दररोजच्या जीवनातील विज्ञान यावर प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच याचा वापर केल्याने कमी वेळेत अधिक व अचूक उदाहरणे सोडवता येतात तसेच विज्ञानाच्या विविध संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे जात असल्याचे सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपक कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले


