जामनेर – जामनेर शहरातील न्यु इंग्लिश स्कूल मधील ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज येथे घडली .

सविस्तर वृत असे की न्यू इंग्लिश स्कूल मध्ये टिना सतिष तुळस्कर (लोणारी) हि नववी (आय) च्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी . दिनांक १०/१/२०२३ रोजी वर्गातील शेवटचा तास ११:३० च्या सुमारास होता. शिक्षक वर्गात येण्याच्या आधिच तिसऱ्या मजल्याचे व्हरांडयात उभी होती आणि अचानक खाली पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड पळापळ सुरू झाली.
हि घटना घडल्याने विद्यार्थ्यां मध्ये भितीचे वातावरण पसरलेले होते. टिना तुळस्कर हीला जखमी अवस्थेत पालकांच्या व कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील विजयानंद हॉस्पिटल व समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू गंभीर जखमी झाल्याने शहरातील अद्यावत रुबी स्टार मल्टिस्पेशालीटी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले दरम्यान कंबरेला तसेच पायाला गंभीर दुखापत झाल्याने तीला पुढील उपचारासाठी जळगांव येथे हलविण्यात आले आहे .
ही विद्यार्थिनी अचानक तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली , पाडली की काही घातपाताचा प्रकार आहे याबाबत तपास सुरु आहे


