बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये क्रॉस कंट्री रेस संपन्न

भुसावळ दि.१० – येथील नामांकित बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये आज शाळेच्या क्रॉस कंट्री रेसचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, संस्थेच्या सचिव डॉ संगीता बियाणी , संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ स्मिता बियाणी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी , पियुष बियाणी,राजू पारीख ,प्रवीण भराडीया आदी उपस्थित होते. याप्रसंगी भुसावळ वाहतूक नियंत्रक शाखेचे ए.एस.आय.शब्बीर तडवी ,पो.का. मो.अली सैय्यद,पो.का.हेमंत जंगले,पो.का
विनोद पाटील. महिला पो.का.संगीता साबळे इत्यादी बंदोबस्त व वाहतूक सुरक्षेसाठी उपस्थित होते .
या क्रॉस कंट्री रेस मध्ये इ.पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्याचा प्रथम गट व इ.पाचवी ते सहावी द्वितीय गट इ. सातवी व आठवी विद्यार्थ्याचा तृतीय गट व नववी ते अकरावी चतुर्थ गट असे गट तयार करण्यात आले होते.शाळेच्या एकूण 800 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात हिरीरीने सहभाग नोंदवला.
विजय स्पर्धक याप्रमाणे – प्रथम गट मुली : प्रथम इशिका धनगर द्वितीय शुभांगी पाटील तृतीय कल्याणी कोकणे, मोक्षदा तायडे. प्रथम गट मुले : प्रथम रोहित पाटील द्वितीय साहिल बोरसे तृतीय मनीष काटे. दुसरा गट मुली : सपना गोले, द्वितीय पल्लवी चौधरी , तृतीय अनुष्का पाटील. मुलांमध्ये प्रथम हर्ष दिवाकर द्वितीय, ओम बारवाल, तृतीय दुर्वेश धनगर.
तिसरा गट मुली : प्रथम गुंजन कळस्कर, द्वितीय मोनिका गोले, तृतीय त्रिशा पाटील.
तिसरा गट मुले : प्रथम योगेश कोलेकर, द्वितीय केदार सूर्यवंशी, तृतीय सुपेश शिंगोटे
चौथा गट मुली : प्रथम तेजस्विनी पावरा, द्वितीय वंदना पावरा,तृतीय सानिया तडवी. चौथा गट मुले : प्रथम क्रमांक अभय पावरा, द्वितीय अमोल बारेला, तृतीय अंकुश संतोष पाटील.
सदर स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकवणाऱ्या धावपटुचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरव करण्यात आला.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डी एम पाटील तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.