जळगाव – थंडीचे वाढते प्रमाण पाहता शहरातील रस्त्यावरील अनेक गरजू बेघर तसेच अनाथ लोकांना जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅंकेट वाटप करण्यात येवून मायेची ऊब दिली. .

संस्थेच्या सदस्या किमया पाटील ह्यांचे वडील स्व. दयानंद सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गोलाणी मार्केट, सिव्हिल हॉस्पिटल याठिकाणी गरजु ,रस्त्याच्या कडेला फाटक्या कपड्यांवर थंडीत झोपलेले भिकारी, निराधार वृध्द यांना जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सौ.मनिषा पाटील, श्रीमती शोभा पाटील, किमया पाटील, नूतन तासखेडकर यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले. यासाठी श्री मुकेश महाजन व श्री पवन शिरसाळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.


