भुसावळ – भुसावळ स्पोर्टसअँड रनर्स असोसिएशनच्या ५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भुसावळचे पहिले आयर्न मॅन विजय फिरके यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातारा येथील, सातारा हिल मॅरेथाॅनचे अध्यक्ष डाॅ.संदीप काटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री फिरके यांनी एका वर्षात रनिंग ,स्विमिंग व सायकलींग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करुंन युवकाना फिट अँड फिटनेस बाबत चांगला संदेश दिला याबद्दल डाॅ.संदीप काटे यांनी सत्कार केला .
प्रसंगी भुसावळ स्पोर्टस अँड रनर्स असोसिएनचे अध्यक्ष प्रविण फालक, प्रविण पाटील,डाॅ.तुषार पाटील, सौ.डाॅ.चारुलता पाटील,सौ डाॅ.निलिमा नेहेते यांचेसह सर्व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.



