साईबाबा पदयात्रा पालखी श्रीक्षेत्र शिर्डी येथे रवाना

भुसावळ :-शहरातील श्री साई मित्र मंडळातर्फे ऑर्डनन्स फॅक्टरी येथून ६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र शिर्डी येथे पदयात्रा पालखी रवाना झाली. या पालिखी यात्रेत अनेक साईभक्त सहभागी झाले आहेत. ही पालखी श्री साईमंदिर झेडटीएसमार्गे झेडटीएस, ऑर्डनन्स फॅक्टरी गेट, लिंम्पस क्लब, रेल्वे हॉस्पिटल, यावल नाका, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्समार्गे अष्टभुजादेवी, नाहाटा कॉलेज चौफुली मार्गे साईबाबा मंदिर जामनेर रोड येथे दुपारी १२ वाजता आली. यावेळी पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भक्तांनी जामनेररोडवरील साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. याप्रसंगी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान हि पालखी जामनेर रोडवरील साईमंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी गारखेडा येथे पोहचणार आहे. याप्रंसंगी पहिल्या दिवशी रात्रीचा मुक्काम घेवून सकाळी मार्गस्थ होईल, त्यानंतर पहूर, पाचोरा, कजगाव, तळेगाव, नांदगाव आदी स्थळी मुक्काम केल्यानंतर नगरसूलमार्गे शिर्डी येथे मार्गस्थ होईल. यावेळी साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शिर्डीतीला साई आश्रम २ मध्ये मुक्काम करून भुसावळकडे मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यामध्ये साई भक्त बिपीन भांबरी, दिनेश शिंदे, किशोर पाटील, पंकज बडगुजर, सुभाष महाजन, अनिल चौधरी, सुनिल सोनवणे, तसीष कापडणे आदींसह साईभक्त सहभागी झालेले आहेत. पालखी सोहळ्याचे यंदा १४ वे वर्ष असल्याचे आयोजकांनी सांगितले.