भुसावळ रेल्वे विभागाने वर्षभरात ९.५ लाख फुकट्या प्रवाशांकडून मिळवला ७३ कोटीचा महसूल

भुसावळ :-भारतीय रेल्वेचा मध्य रेल्वे “हृदय” तर मध्य रेल्वेचा भुसावळ रेल्वे विभाग “आत्मा” आहे. इगतपुरी (घोटी) ते बडनेरा ५२७ कि.मी. व इगतपुरी (घोटी) ते मध्य प्रदेशातील खंडवा ४७२ कि.मी. चे रेल्वे रुळाचे नेटवर्क (कनेक्टिव्हिटी) भुसावळ विभागात पसरले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करण्यासाठी प्रवासांना भुसावळ रेल्वे स्थानक अत्यंत सोयीचे आहे, लाखो प्रवासी येथून प्रवास करतात यातच प फुकटे प्रवासही मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. रेल्वे विभागाने जानेवारी ते डिसेंबर सन २०२२ या वर्षांमध्ये ९ लाख ५५ हजार ६०० फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ७३ कोटी २७ लाख ४६ हजार चा महसूल प्राप्त केला आहे.
भुसावळ विभागातून दररोज १५० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या धाव असतात यातून शेकडो प्रवासी दररोज प्रवास करतात. सद्यस्थितीला निर्बंध मुक्त वातावरण नाथ सन उत्सव साजरे होत असल्याने परगावी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे सुरक्षित कमी खर्चिक व आरामदायी प्रवासासाठी नेहमीच प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात.

फुकट्या प्रवाशांकडे प्रशासनाची करडी नजर

प्रवासी प्रवास करण्यासाठी आपल्या सोयीनुसार नियोजन करून आधीच आरक्षित तिकीट काढून घेतात मात्र अशाच वेळेस अनेक प्रवासी जनरल तिकीट काढून स्लीपर क्लास मध्ये बसतात तर स्लीप वर क्लासचे प्रवासी एसी डब्यात बसतात तर अनेक प्रवासी हे विना तिकीट प्रवास करतात अशा सर्व अनियमित व विना तिकीट प्रवास करणाऱ्या कडून रेल्वे प्रशासन सातत्याने मोहीम रावेत असते या मोहिमेदरम्यान फुकट्या प्रवाशांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते.

तिकीट निरीक्षकांची संख्या कमी

प्रवासी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्या तुलनेत टिसींची संख्या कमी आहे. फुकट्या प्रवासांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढत असले तरी फुकट्या प्रवाशांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे .ज्या तिकीट तपासणीची जबाबदारी टीसी कडे असते मात्र मुळात टीसी ची संख्या त्या तुलनेत कमी आहे.

भुसावळ विभागातील एकूण टीसीसी संख्या -८४२

उपलब्ध टीसी -६४८

रिक्त जागा( वेकेन्सी) -१९४

भुसावळ स्टेशन डेपो

सॅंक्शन टीसी ची संख्या-४८०
कर्तव्यासाठी उपलब्ध टीसी-३४८
रिक्त जागा ( वेकेन्सी)-९४

“प्रवाशांनी उचित तिकीट काढूनच रेल्वे प्रवास करावा. विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा तर आहे शिवाय प्रवाशांना प्रवासादरम्यान दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. तसेच जनरलचे तिकीट काढून आरक्षित डब्यात व आरक्षीत स्लीपर क्लास डब्याचे तिकीट काढून एसी डब्यातून प्रवास करू नये.

-डॉ. शिवराज मानसपुरे
वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक , भुसावळ