खंडवा स्टेशनवर महत्वाच्या कामामुळे रविवारी व सोमवारी ब्लॉक : सहा रेल्वे गाड्या रद्द –

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील खंडवा येथे एन.आय. कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवार, सोमवार असे दोन दिवस ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे खंडव्याकडे जाणार्‍या इटारसी, कटनी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे प्रवाशांचे पुन्हा हाल होणार आहे.

रेल्वे प्रवाशांचे पुन्हा होणार हाल
रेल्वे प्रशासनातर्फे सुरू होणार्‍या कामामुळे रविवार, सोमवार असे दोन दिवस ब्लॉक घेतला आहे. ज्यामध्ये खंडव्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील लाइनीचे अप आणि डाउन माल लाइनवर ट्रॅक सर्किटची तरतूद करण्यात येत आहे. ज्यामध्ये 8 जानेवारीला सकाळी 9.50 ते रात्री 9.50 पर्यत आणि दि. 9 या दिवशी दुपारी 3.50 ते सायंकाळी 6.50 वाजेपर्यंत तसेच दि. 9 जानेवारीलाच सकाळी 9.50 ते दुपारी 3 पर्यत एनआय कार्य केले जाणार आहे. अप आणि डाउनसह वाहतूक ही ब्लॉक राहणार आहे. प्रवाशांनी याची नोद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या गाड्या झाल्या रद्द
8 व 9 असे दोन दिवस भुसावळ – इटारसी एक्स्प्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे तर इटारसी-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 8 व 9 जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. भुसावळ-कटनी एक्स्प्रेस ही गाडी 8 व 9 जानेवारी असे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे तर कटनी-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 8 व 9 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे तसेच खंडवा बीर खंडवा या अप मार्गावरील तीन व डाऊन मार्गावरील तीन अश्या सहागाड्या 8 व 9 जानेवारीला रद्द करण्यात आल्या आहेत.

मार्ग बदल गाड्या अशा
9 रोजी सुटणारी सुरत-छपरा एक्स्प्रेस ही गाडी रतलाम, नागदा, भोपाळ मार्ग वळविली आहे. तर 8 जानेवारीला सुटणारी छपरा सूरत एक्स्प्रेस ही गाडी भोपाळ, नागदा, रतलाम मार्गे धावणार आहे तर 8 जानेवारीला सुटणारी जम्मू तवी नांदेड एक्स्प्रेस ही गाडी इटारसी, जुझारपूर, बडनेरा, नरखेड, अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.