भुसावळ – वरणगाव येथील शहर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे मासाहेब स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ‘ममता दिंन’ म्हणून दि. ६ जानेवारी शुक्रवार रोजी शिवसेना संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी तमाम शिवसैनिकांच्या वासल्यमूर्ती मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस ६ जानेवारीला ‘ममता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. वरणगाव शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालयात मासाहेब स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी (आपला माणूस), उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक शेख सईद, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, राम शेटे, तालुका अल्पसंख्यांक संघटक मोहसीन खान, शाखा प्रमुख शेख सत्तार (बाबा), माजी उपशहरप्रमुख सुनिल भोई, संजू कोळी, नंदू खराटे, शिवा भोई, प्रल्हाद माळी, विभाग प्रमुख किरणं माळी, मोहन धनगर, हनीफ कच्ची, आबा सोनार, विकी मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


