नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिन साजरा


जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिका दिन शिरसोली रोडवरील भिल्ल वस्ती येथे दिनांक 3 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. सर्वात प्रथम स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमचे पुजन प्रथमतः नारीशक्ती बहुद्देशीय संस्था अध्यक्ष सौ मनीषा पाटील व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे यांनी हार घालून पूजन केले. यानंतर बालिकांचे औक्षण करून पूजन करण्यात आले. सौ मनिषा पाटील यांनी सावित्रीबाईं फुले यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती सांगितली. सुरुवातीला सर्व बालिकांच्या हस्ते केक कापण्यात आला नंतर बिस्किट खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन नूतन तासखेडकर यांनी केले. आभार किमया पाटील हिने मानले. याप्रसंगी योगिता बाविस्कर, माधुरी शिंपी, मरियम बुगडवाला, भाग्यश्री महाजन ,रेणुका हिंगु, शशी शर्मा हे पदाधिकारी उपस्थित होते.