भुसावळ –
प्रत्येक नवयुवकाने जीवनात मोठे ध्येय ठेवल्यास मोठे व्यक्तिमत्व निर्माण होईल असे प्रतिपादन नववर्षी निमित्त स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत प्रशासन आयोजित एमपीएससी यूपीएससी पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यसेवा आयोग सदस्य प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे सर यांनी साकेगाव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षात भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या
प्रसंगी प्रशिक्षक राहुल भालेराव सर उपसरपंच आनंद ठाकरे डॉक्टर बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे सौ. चौधरी मॅडम सौ प्रीती मॅडम गजानन कोळी सह गावातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यां सह मान्यवरांची उपस्थिती होती
स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत युवकांना व महिलांना युतींना एमपीएससी यूपीएससी पोलीस भरती प्रशिक्षण वर्ग तसेच ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच देऊन प्रोत्साहित केले प्रसंगी बोलताना त्यांनी प्रत्येक युवकाकडे ध्येय जिद्द चिकाटी व प्रचंड आत्मविश्वास आणि त्याचबरोबर लक्ष प्राप्त करण्यासाठी सचोटी समर्पण व सातत्य असणे गरजेचे आहे
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी रटाळपणात टाळावा
कुठल्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा या संदर्भात सविस्तर माहिती त्यांनी वर्णन केली प्रसंगी नापास होणे म्हणजे खचून न जाता तीच यशाची पहिली पायरी समजून पुनश्चिद्दीने त्याच पद्धतीने उभे राहणे यावर त्यांनी चेंडूचे खूप सुंदर उदाहरण दिले मातीचा ढिगूळ खाली पडल्यास ढासाळतो मात्र चेंडू होऊन तुम्ही जंगलात तर कितीही जोरात तुमच्यावर प्रहार झाला तरी तुम्ही त्याच ताकदीने त्याच उमेदीने त्याच जिद्दीने तितक्याच प्रचंड ताकदीने उठून उभे राहिले पाहिजे असे स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागृत करून या स्मार्ट व्हिलेज साकेगावातील विद्यार्थी युवक स्मार्ट अधिकारी म्हणून निर्माण होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी कित्येक उदाहरण दिले त्यांच्या सानिध्यात असलेले कितीतरी अधिकारी आय एस आय पी एस कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सीईओ झालेले त्यांची माहिती त्यांनी या ठिकाणी सविस्तर दिली त्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी गोष्टींच्या स्वरूपात सांगितले या उपक्रमामुळे निश्चित साके गावातील विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन प्रेरणा जागृत झालेली असून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन निश्चित गावातील विद्यार्थी
लौकिक मिळतील असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केलेला आहे
दिनांक 2 जानेवारी 2023 पासून ते 15 जानेवारी 2023 पर्यंत दररोज एक तास सकाळी नऊ ते दहा या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरील सभागृहात पोलीस भरती एमपीएससी यूपीएससी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन राहुल भालेराव सरांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या दरम्यान अनेक मान्यवरांचा आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे तसेच दुपारी एक ते दोन या वेळेत युतीसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक 15 जानेवारी रोजी या उपक्रमाचा समारोप सोहळा होईल सर्व सहभागी युवकांना सर्टिफिकेट प्रदान करण्यात येतील तरी गावातील जास्तीत जास्त युवकांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे



