भुसावळातील माजी नगरसेविकेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले –

भुसावळातील माजी नगरसेविकेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले –

भुसावळ : शहरात धूम गँग पुन्हा अ‍ॅक्टीव्हेट झाली असून भुसावळातील नंदन कॉलनीमधील रहिवासी तथा माजी नगरसेविका शारदा शरद झोपे यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवार, 31 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरातील महिलावर्गात भीती पसरली आहे.
शनिवारी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास शारदा शरद झोपे नदनवन कॉलनीतील निखील वायकोळे यांच्या रूप लक्ष्मी घराजवळून पुरुषोत्तम नगर नंदनवन कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून धूम स्टाइल आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीचे 12 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केला. झोपे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांत दोन भामट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.