भुसावळ – पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून गरीब व होतकरू नागरीकांना दिवाळीचा फराळ तसेच कपडे मिळावे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मिळून त्यांचे घरातील चांगले कपडे व दिवाळीचे फराळ एकत्रित केले, साधारण पाचशे ते सातशे कपडे व 35 ते 40 किलो दिवाळीसाठी लागणारे फराळ हे गेल्या तीन दिवसात ताप्ती पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जमा करून गुरुवारी गंगापूरी येथे गरीब वस्तीत होतकरू लोकांना व लहान मुलांना व महिलांना कपडे साड्या दिवाळीचे फराळ वाटप केले. त्यानंतर भुसावळातील राहूल नगर जवळील वस्तीत उरलेले कपडे व फराळ गरीब नागरिकांना व लहान मुलांना देण्यात आले.
यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर सोबत त्यांचे शिक्षक गोपाल जोनवाल,अर्जुन सणस,विजय संकत,निलेश फंड,डॅनिअल पवार, रचना महाजन, सोनिया टेकवानी,शेफाली श्रीवास्तव आदी उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर म्हणाल्या की आमची शाळा गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे व आमच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना असले उपक्रम राबवण्यासाठी आनंद वाटतो, जेणेकरून गरीब वस्तीपर्यंत घरोघरी दिवाळीचा फराळ गेला पाहिजे असं ध्येय आमच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आहे असं त्या म्हणाल्या. दिवाळीच्या वेळेस गरीब जनतेपर्यंत व नागरिकांपर्यंत फराळ व कपडे पोहोचवण्याचे हा उपक्रम फक्त ताप्ती पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यां करत आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांनी हा आगळावेगळा उपक्रम केल्याने शहरात एकच चर्चा आहे.



