वभुसावळ – वरणगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शाखेचे मुस्लिम बहुल भाग असलेला वॉर्ड क्र. एक मध्ये बुधवारी सायंकाळीं ७ वाजता मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीत भुसावळचे संपर्कप्रमुख सुरेश राणे, जिल्हाप्रमुख महाजन सर यांनीं उद्घाटन केले.

शहरातील मुस्लिम बहुल भाग असलेल्या अक्सा नगरात वॉर्ड क्र. एक मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शाखेचे प्रारंभी अक्सा नगरात फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात शाखा उद्घाटन झाले. प्रास्ताविक शहरप्रमुख संतोष माळी यांनी केले.
याप्रसंगी संपर्कप्रमुख सुरेश राणे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, रावेर लोकसभा सह समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, अल्पसंखांखं उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी यांनी मनोगत वेक्त केले.
अक्सा नगर शाखेचे पदाधिकारी शेख सत्तार शेख जब्बार, उपशाखा प्रमुख इरफान खान एहसान खान, खजिनदार शेख जाफर शेख गनी, सदस्य इम्रान शेख, योगेश सतावकर यांचा सत्कार संपर्क प्रमुख सुरेश राणे यांनी केले.
यावेळी उप तालुकाप्रमूख सुभाष चौधरी, भुसावळ अल्पसंखांखं संघटक मोहसीन खान, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, अझहर शेख, सुनील भोई, माजी ग्रा. प. सदस्य विलास वंजारी, संजीव कोळी, आबा सोनार, शिवा भोई, संदीप वाणी, विक्की मोरे, हनीफ कच्छी, सुनील देवघाटोले, समीर शेख, प्रल्हाद माळी, किरण माळी, राहुल वंजारी, सागर वंजारी, नितेश बोडदे, प्रवीण वाकोडे, राजेश थोरात, नंदू खराते, संजीव खराते, फारुख पेंटर, कृष्णा पूजारी, सेख सद्दाम यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


