सौ.मधुमती भावसार यांची आॅल इंडिया भावसार क्षत्रिय महिला परिषदेच्या सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट पदी निवड : जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ – सौ.मधुमती (ज्योती)जगदीश भावसार
ताई 27 वर्षांपासून भुसावळ येथील भावसार क्षत्रिय महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहे. उत्क्रुष्ट कार्य, विवीध विधायक उपक्रम राबवून ताईंनी भुसावळ महिला मंडळाचे नाव महाराष्ट्रात एक नंबरवर आणून ठेवले . महाराष्ट्र भावसार महिला परिषद वर उत्तम कार्य पाहून .महासभेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना डिसेंबर २०११ ला हुबळी येथे जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले
ऑल इंडिया भावसार क्षत्रिय समाज महिला परिषदेची दहा वर्षे वर्किंग कमिटी मेंबर व दहा वर्षे ट्रेझरर असा ताईंना महासभेचा वीस वर्षांचा सहवास लाभला म्हणून महासभेने सौ.मधुमती भावसार यांना भावसार रत्न अवार्ड देऊन सन्मानित केले
आज पर्यंतच्या उत्तम कार्याची दखल घेऊन महासभेने पुन्हा 2022 ते 2026 पर्यंत राष्ट्रीय अध्यक्षा सौ.अनुपमा मगरे यांनी जेष्ठ उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती केली..
सौ.मधुमती जगदीश भावसार यांना श्री हिंगलाज माता प्रगट दिनाचे औचित्य साधुन भावसार क्षत्रिय समाज भुसावळ व महिला मंडळ यांनी पुष्पगुच्छ आणि साडी व खण नारळाची ओटी भरुन सन्मानित केले*
यावेळी समाज अध्यक्ष श्रीराम देवताळु, उपाध्यक्ष प्रा.सुरेश प्रभाकर भावसार, दिलीप वाघमारे, राजेन्द्र पंचघरे,सचिन पवार, सुर्यकांत साखरे,अँड रमेश पांडव, नितीन खानोरे, जगदीश भावसार,दिलीप कुंटे आणि संपूर्ण महिला मंडळ अशे सुमारे ३०० महिला व पुरुष हजर होते.समारोप श्री हिंगलाज मातेच्या महाप्रसादाने झाला.. समस्त भावसार समाजाच्या वतीने अभिनंदन करुंन पुढील वाटचालीस शुभेच्छा.दिल्या