मनमाड –
भारतीय वेटलिसटिंग संघटना व भारतीय क्रीडा प्राधिकरण आयोजित मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेटलिस्टिंग प्रशिक्षण शिबिरासाठी नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील जय भवानी व्यायाम शाळेची खेळाडू पूजा राजेश परदेशी यांची निवड करण्यात आली असून,वीस दिवसाचे प्रशिक्षण घेण्यासाठी मलेशिया येथे रवाना झाली आहे. भारतातील गुणी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिराचा अनुभव मिळावा व त्यांच्या कामगिरी जास्तीत जास्त सुधारणा व्हावी नवीन क्रीडा कौशल्य आत्मसात करावी या दृष्टीने या स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून भारताच्या विविध भागातील विस खेळाडूंची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. पूजा सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण पत्तीयाळा येथे वेटलिफ्टिंगचा सराव करत आहे.
मनमाड येथील छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी जय भवानी व्यायाम शाळेचे पदाधिकारी यांनी पूजा परदेशींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.



