मुक्ताइनगर – महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन च्या मान्यतेने महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन इंदापुर पुणे येथे दिनांक 21 ते 23 पर्यंत स्पर्धा आयोजित केले आहे त्या साठी जळगाव जिल्हा च्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेची निवड चाचणी दिनांक 18 ला मुक्ताईनगर येथे तळेकार फिटनेस हब येथे नियोजन करण्यात आले होते त्यात जळगाव जिल्हातिल अनेक पॉवरलिफ्टिंग प्रेमी खेळाडूंनी सहभाग केला व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे सचिव डॉ संजय निकम सर व नैशनल पॉवरलिफ्टिंग कोच प्रफुल्ल रमेश निकम सर यांचा मार्गदर्शनाखाली खेळाडूंची निवड करण्यात आली व स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ प्रवीण पाचपांडे सर व सामाजिक कार्यकर्ता पवन सोनावणे व तळेकर फिटनेस हब चे मालक दिपराज तळेकार व फिटनेस कोच शुभम तळेकार व सामाजिक कार्यकर्ता सागर जाधव यांचा हस्ते करण्यात आले व स्पर्धेत सर्वात जास्त वजन उचलून स्ट्रॉन्ग म्यान चा मान प्रफुल्ल मेढ़े याने मिळवला व स्पर्धा बघायला आलेल्या मुक्ताईनगर चे जनसमुदाय यांनी विजयी खेळाडूंना पुढील राज्यस्तरीय स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या



