भुसावळावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज मध्ये बँक सतर्कता जागरूकता सप्ताह 2022″संपन्न ;


भुसावळ – शहरातील बालाजी मंदिरासमोर असलेल्या अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये नुकताच १८ रोजी
बँक सतर्कता जागरूकता सप्ताह 2022″संपन्न झाला यावेळी
युनियन बँक टिंबर मार्केट ब्रांचच्या बँक मॅनेजर सौ. सुषमा कांबळे व त्यांचे सहकारी.प्रफुल कोड़ (क्रेडिट ऑफिसर), परण थोटे( विशेष सहाय्यक ) व इतर बँक अधिकारी यानं
यांनी भेट दिली.व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले
यावेळी बँक मैनेजर सौ. सुषमा कांबले यांनी
” बँक सतर्कता जागरूकता सप्ताह 2022″
याबद्दल मार्गदर्शन करून बँकेचे व्यवहार ,ऑनलाइन बँकीग , मोबाईल बँकिंग , याबद्दल विशेष माहिती देऊन आजकाल ऑनलाइन व डिजिटल व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक व त्यापासून जागरूक राहून सतर्कता कशी बाळगावी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले.
यावेळी आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे
यांनी सध्या सगळीकडे दिवाळी ची खरेदी जोरात सुरु आहे,
तरी सर्वानीं ऑनलाइन खरेदी न करता स्थानीय दुकानदारां कडूनच खरेदी करावी असे सर्वांना आवर्जून आवाहन केले…
यावेळी पॅरामेडिकल कॉलेज च्या प्राचार्या सौ. मनीषा बाविस्कर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले ,यशस्वीतेसाठी पौर्णिमा पाटिल,प्रजावती ,कविता ,
ऐश्वर्या,सुनीताव कॉलेजची संपूर्ण टीमने प्रयत्न केले.