भुसावळ –
विवेकानंद शाळेत भुसावळ वकील संघ व तालुका विधी सेवा समिती यांच्याद्वारे जागतिक कन्या दिनानिमित्त मुलींना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ॲड .जास्वंदी भंडारी, ॲड. विक्रम शेळके हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्त्रीरोग तज्ञ डॉ.योगिता फेगडे यांनी भूषविले.
बदलत्या काळात मुलींनी बाहेर वावरतांना कोणती काळजी घ्यावी तसेच आई-वडिलांना विश्वासात घेऊन कोणी बाहेर चुकीचे वागत असल्यास सांगणे. त्याचप्रमाणे पोक्सो कायद्या व इतर कायद्यांची थोडक्यात माहिती दिली. स्वसंरक्षणासाठी जुडो कराटे असे प्रशिक्षण घ्यावे असे मार्गदर्शनपर भाषणात सांगितले, ॲड विक्रम शेळके यांनी महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे पूर्वीच्या स्त्रियांनीही घरासोबत रणांगणही गाजवले आताच्या मुलींनीही त्यांच्या आदर्श घ्यावा असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगिता फेगडे यांनी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी मानसिक व शारीरिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे व त्यासाठी सकस आहार योग्य व्यायाम ,योगा किती गरजेचा आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळी व घ्यावयाची काळजी व स्वच्छता याविषयी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनंदा खरे यांनी केले. सूत्रसंचालन श्री अमोल ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन दिपक बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमासाठी भुसावळ वकील संघ अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन व विवेकानंद शाळेचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश साठे, राहुल दिवयवीर ,विलास फटकळ, सचिन महाजन व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.



