भुसावळ – सन २०१९ च्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या कारणावरून राज्यातील ७८८४शिक्षकांना अपात्र घोषित करून त्यांची यादी नुकतीच जाहीर केली.त्या शिक्षकांचे ऑगस्ट २२पासून पगारही रोखून ठेवले आहेत.,उच्च न्यायालयाने मात्र शासनाची ही कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे,ते प्रकरण गाजत असताना आता परिषदेने सन २०१८ मधील टी. इ. टी.परीक्षेतही १६६३ शिक्षकांची यादी जाहीर केली असून त्यांना ही गैव्यवहारप्रकरणी अपात्र घोषित केले आहे..पण गंमत अशी की, ज्या शिक्षकाने ही परीक्षा दिली,पण तो नापास झाला त्याचेही नाव सादर यादीत आहे! म्हणजे नापास होण्यासाठीही गैव्यवहार करावा लागतो की काय?हे तर महान आश्चर्य आहे!जगात कोठेही नसलेला अजब गजब करून आम्ही काहीही करू शकतो हेच परीक्षा परिषदेने सिद्ध केले आहे! याचा दुसरा अर्थ ,परीक्षा परिषदेचा कारभारच बोगस असून ती म्हणजे तेथील संबंधित अधिकारीही अपात्र आहेत ,मग यांचेही वेतन थांबविणार का?त्यांचेवर अकार्यक्षम म्हणून त्यांचीही चोकशी करणार का?वेळोवेळी शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या परिषदेचा चमत्कारिक कारभार पाहून घोषित यादी कितपत यथार्थ मानावी अशीही शंका निर्माण होत आहे.परीक्षेत गैव्यवहार करणाऱ्या शिक्षकांची जशी यादी जाहीर केली तशी ह्यातील एजंट कोण आहेत?कोणाच्या माध्यमातून हा गैव्यवहार झालाय त्यांची यादी का नाही जाहीर करत .त्यांना रान मोकळे कसे?असा प्रश्न शिक्षकांचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षणतज्ज्ञ प्र. ह.दलाल यांनी एका पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.



