भुसावळ- प्रतिनिधी
आपलं तेली समाज संघ मोफत वधू वर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई ) स्थित असलेल्या संस्थेच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी उज्वला बबनराव बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकमेकां सहय्य करू अवघेची धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे तेली समाजाच्या उन्नती साठी आपल्या सडेतोड लिखाणातून सर्वच घटका न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्या उल्लेखनिय कामगिरी बघता राज्य कार्यकारणी मंडळाने जेष्ठ पत्रकार उज्वला बागुल यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावरून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत वाडीभस्में , मावळ तालुकाअध्यक्ष चंद्रकांत जाधव , जळगाव जिल्हा अध्यक्ष संतोष बळीराम चौधरीं , नाशिक तेली समाज सचिव सुनील शिरसाठ, जगदीश जाधव , पंडित जाधव , राजेंद्र पंडित , नंदकुमार भागवत , गणेश सोनवणे , निलेश सोनवणे , राजेश सहदेव सोनवणे , विश्वास लांजेवार , नरेश सोनवणे ,मंदार बागुल , संतोष बागुल , मुरलीधर कळसकर , सुधाकर चौधरीं , किशोर गवळी , अनिल बागुल , चंद्रकांत बागुल यांचेसह सर्व पदाधिकारी समाज बंधू भगिनी व मित्र परिवार यांनी बागुल यांच्या भविष्यातिल वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.
गेल्या चार दशकापासून विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वच घटकाना बातमी व लेख रूपातून न्याय मिळवून देण्याचा कसोशीन प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजबांधवानीं माझ्या कार्याची दखल घेत माझ्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहचून आपण कार्य करणार असल्याचेही उज्वला बागुल यांनी सांगितले.



