वरणगाव –
4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्त महात्मा गांधी विद्यालय मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दहा ऑक्टोबरला मी वैज्ञानिक बोलतो या कार्यक्रमाने या सप्ताहाचा समारोप करण्यात आला
विक्रम साराभाई इनोव्हेशन सायन्स सेंटर हर घर बाल कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटर एपीजे अब्दुल कलाम विपनेत क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंतराळ दिन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वंदना चव्हाण होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका रूपा कुलकर्णी पर्यवेक्षक पी जे पाटील बी एम राठोड कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटरचे नॅशनल प्रोजेक्ट डायरेक्टर सुनील वानखेडे आदी उपस्थित होते
4 ऑक्टोबर पासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चित्रकला, निबंध, मॉडेल मेकिंग व मी वैज्ञानिक बोलत आहे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांचे जीवन वृत्तांत सांगितला तसेच भविष्यकाळात आपण संशोधनाकडे लक्ष देऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय घेतला या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना गोल्ड सिल्वर व ब्राझ मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे

संशोधन सर्वोच्च क्षेत्रामध्ये
संशोधन म्हणजे विज्ञानापुरता मर्यादित नसून दररोजच्या जीवनामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज आहे समाजाला उपयोगी व कमी खर्चिक अशा साधनाची गरज आहे ते केवळ संशोधनातून शक्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट घडत असताना त्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे व त्यामध्ये आपण काय नाविन्यता निर्माण करू शकतो याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष वाचनात मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय आर पाटील यांनी तर आभार आर एन सावळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी साठी विज्ञान मंडळ व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले


