भुसावळात ग्रामीण प्रकल्पाचा पोषण माह 2022 तालुकास्तरिय मेळावा संपन्न :

भुसावळात ग्रामीण प्रकल्पाचा पोषण माह 2022 तालुकास्तरिय मेळावा संपन्न :
भुसावळ – भुसावळ तालुक्यातील ग्रामीण प्रकल्पाचा पोषण माह 2022 तालुकास्तरिय मेळावा दि 17 सप्टेंबर रोजी स्थानिक लोणारी मंगल कार्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे खासदार रक्षाताई खडसे, अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत , रजनी सावकारे (अध्यक्षा प्रतिष्ठा महिला मंडळ) यांची विशेष उपस्थिती होती . व्यासपीठावर डॉ मृणाल पाटील , जयश्री चौधरी, सीडीपीओ रेखा गायकवाड,नगरसेवक परीक्षित ब-हाटे , भाजप जिल्हा युवा मंच अध्यक्ष श्रीकांत महाजन , कुमावत सर होते. खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर खासदारांच्या सभेतही पौष्टिक आहार बाबत मार्गदर्शन करतात हे आवर्जुन सांगितले.त्यांनी पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल रजनी सावकारे यांचे कौतुक केले.
आमदार यांनी किशोरी मुलींना पोषक आहाराचे महत्व सांगितले. तसेच राऊत सरांनी आयसीडीएस विविध योजनां बाबत माहिती दिली. कार्यक्रमात पोषण पाककृती स्पर्धा साठी 200 डिश सेविका मदतनीस यांनी बनवून आणल्या होत्या. रांगोळी स्पर्धा ,मेंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा ,बेटी बचाव पोस्टर स्पर्धा ,सुदृढ बालक स्पर्धा इ.विविध स्पर्धामध्ये किशोरी मुली, आर. जी. झामरे शाळेच्या विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धा चा बक्षिस समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.परीक्षक म्हणून जयश्री चौधरी यांनी काम पाहिले. त्याचबरोबर पारंपारिक खेळण्यांचे प्रदर्शन केले होते. मान्यवरांनी सदर खेळांचा आनंद लुटला .
किशोरी मुलींना डॉ मृणाल पाटील यांनी आरोग्य व किशोरीवयातील बदल, घ्यावयाची काळजी या विषयावर प्रोजेक्टर द्वारा मार्गदर्शन केले. सुदृढ बालकांना सर्टिफिकेट व स्वछता किट देण्यात आले. भुसावळचे छायाचित्रकार अभिराम मेहंदळे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन पर्यवेक्षिका जयश्री जोशी-दवे यांनी व आभार प्रदर्शन संध्या रोजतकर यांनी केले.
आयसीडीएस कार्यालयाचे पर्यवेक्षिका शोभा जाधव, अनुपमा बोरीकर,व प्रविण पाटील, सुनील उबाळे, मंगला पाटील, प्रसाद, अनिता यांनी व तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.