भुसावळात दोन बनावट गावठी पिस्टल सह 5 जिवंत काडतुसे जप्त : दोघां विरुद्ध गुन्हा दाखल :


भुसावळ – शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिरा जवळ दोघांना दोन बनावट गावठी पिस्टल सह 5 जिवंत काडतुसे जप्त करण्याची कारवाई बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकारी यांनी केली .
याप्रकरणी दिनांक 18/09/2022 रोजी तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिरा जवळ दोघे जण त्यांचे कब्जात पिस्टल
बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर पथक घटनास्थळी गेले त्यांनी सापळा रचून याठिकाणी संशयित आरोपी सै. सिकंदर बशरत अली वय 42 राहणार कवाडे नगर भुसावळ , नरेश देविदास सुरवाडे वय 29 राहणार गोलानी कॉम्प्लेक्स हनुमान मंदिर जवळ भुसावळ या दोन जणांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून दोन बनाबट गावठी पिस्टल सह पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहे.
याप्रकरणी फिर्यादी पोकॉ प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्याद नोंद केली
आरोपी जवळ गावठी बनावटीचे दोन पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगतांना मिळून आले तसेच एक हिरो कंपनीची काळ्या लाल रंगाची मोटरसायकल असे एकूण 50,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून संशयित आरोपितांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 3/25 व म.पो.अधिनियम कलम ( 37) (3) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई सपोनि हरीष भोये,पोहेकॉ विजय नेरकर, पोना.निलेश चौधरी,पोना.उमाकांत पाटील, शशिकांत तायडे,पोकॉ.प्रशांत परदेशी,योगेश माळी, सचिन चौधरी, पोना.दिनेश कापडणे अशांनी मिळून केली.