भारत विकास परिषदेतर्फे उद्या राष्ट्रीय समुहगान स्पर्धा अकरा शाळेतील ८० विद्यार्थ्यांचा सहभाग


भुसावळ – येथील भारत विकास परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे मंगळवारी (ता. २०) राष्ट्रीय समुहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात अकरा शाळेतील ८० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रथम येणाऱ्या संघाला प्रांतस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
विद्यार्थ्यांन मध्ये देशभक्तीची भावना रुजावी या उद्देशाने भारत विकास परिषदेतर्फे देशपातळीवर या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यात सुमारे चार लाख विद्यार्थी सहभागी होतात. शाखा, प्रांत व राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर ही स्पर्धा होते. भुसावळ शाखास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या संचालिका डॉ संगिता बियाणी, भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर हॉल येथे होईल. तर दुपारी कर्नल चिंगप्पा, उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होईल. यात प्रथम येणाऱ्या संघाला २४ सप्टेंबरला पैठण येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. शहरातील अकरा शाळेतील ८० विद्यार्थी शाखास्तरीय स्पर्धेत सहभागी होत असुन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विलास फालक, सचिव भूषण वाणी, स्पर्धा प्रमुख संजय लाहोटी यांनी केले आहे.