भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने भुसावळच्या माजी नगरसेविका व बियाणी एज्युकेशन गृपच्या सचीव डॉ संगीता मनोज बियाणी यांना शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल दि.१७ रोजी सुयोग २०२ हा विशेष पुरस्कार देऊन सन्माणीत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय अध्यक्ष श्याम सोनी,अखिल भारतीय महामंत्री संदीप काबरा,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकिशन भनसाली, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा अनुसया मालू हे
उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्कारासाठी भुसावळ येथिल डॉ.संगीता मनोज बियाणी यांची निवड करण्यात आली होती.त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
२०१९-२०२२ या वर्षात महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात आलेल्या शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पुरस्कार त्यांना अखिल भारतीय अध्यक्ष श्याम सोनी, अखिल भारतीय महामंत्री संदीप काबरा,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकिशन भनसाली, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा अनुसया मालू,शैलजा मंत्री, श्यामसुंदर मंद्यानीया, माजी प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी, सतीश चरखा, स्वागत अध्यक्ष भिकूलाल मर्दा, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत मंत्री, महाराष्ट्र प्रदेश युवा संघटन अध्यक्ष हार्दिक सारडा या मान्यवरांच्या हस्ते डॉ.संगीता मनोज बियाणी यांना पुरस्कार देण्यात आला

पुरस्कारात प्रमाणपत्र,शॉल, श्रीफळ व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.भुसावळ सारख्या छोट्या शहरात राहूनही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले व डॉ.संगिता बियाणी यांनी त्यांच्या कार्याचा झेंडा फडकवीला आहे.पुरस्कार स्विकारतांना त्यांच्या सोबत त्यांचे पती उद्योगपती मनोज बन्सीलाल बियाणी,ओमप्रकाश भांगड़िया,सरस्वती भांगड़िया,उमेश भांगड़िया सह परीवारातील सदस्य उपस्थीत होते.या पुरस्कारा बद्दल डॉ.संगीता मनोज बियाणी यांचे संपूर्ण समाजात व भुसावळ शहरात कौतुक होत आहे.


