भावसार क्षत्रिय समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक समारंभ संपन्न.

भुसावळ :- येथील भावसार क्षत्रिय समाजाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक समारंभ संपन्न अध्यक्ष स्थानी भावसार समाजाचे अध्यक्ष श्रीराम देवताळू प्रमुख पाहुणे श्री संत . मोतीराम शिंपी, महीला मंडळ अध्यक्ष ज्योती भावसार आणि आशा ताई नवलपूरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली

. दिलीप वाघमारे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे मागील इतिवृत्त वाचून दाखविले . दरम्यान ज्युनिअर केजी पासून बारावीपर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. केजी ते पाचवी पर्यंत ची सर्व पारितोषिका चे प्रायोजक आशा नवलपूरे यांनी दिले. त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पांडव यांनी केले. अध्यक्ष श्रीराम देवतालु यांनी त्याच्या पोस्टाच्या ४९९/ रु विमा विषयी माहिती सांगितली. आभार प्रदर्शन दिलीप वाघमारे यांनी केले.