भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत ध्वजारोहण उत्साहात ;

भुसावळ – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ चे महाप्रबंधक
अनुराग एस. भटनागर यांच्या हस्ते
प्रशासकीय इमारतीसमोर
ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी त्यांनी कारखान्याची सद्यस्थिती व भविष्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डी.एस.सी चे जवान,
अग्निशमन दल,
आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अप्रतिम मार्चपास्ट केला.
.अनुराग एस.भटनागर यांच्याहस्ते कारखान्यात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच 10वी व 12वी मध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विशेष उपस्थिती महिला कल्याण समिती अध्यक्षा
श्रीमती प्रियरंजना भटनागर आणि
उपाध्यक्षा श्रीमती सुदिप्ता सरकार व त्यांच्या समिती सदस्याही उपस्थित होत्या

ऑडनेंस फैक्ट्री चे ए.जी.एम सुकांता सरकार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि
जे .सी.एम थ्री सदस्य.
जे .सी.एम फोर्थ चे सदस्य, सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
प्रत्येक घरात तिरंगा
स्वच्छता अभियान सांस्कृतिक कार्यक्रम
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
सांस्कृतिक कार्यक्रमात कारखान्याचे माजी ज्येष्ठ कर्मचारी दिगंबर इच्छाराम जंगले यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
अशी माहिती ऑर्डनन्स फॅक्टरी चे (पीआरओ ) बी.देवीचंद
डी.जी.एम यांनी दिली