भुसावळ – अ.भा.विद्यार्थी परिषद व भारतीय शाकाहार संघ यांच्याकडून स्वतंत्र दिवसाच्या अमृत महोत्सवी विविध कार्यक्रम करण्यात आले.

भुसावळ शहरामध्येसर्व स्मारकांवर तिरंगा ध्वज लावण्यात आले , तसेच ध्वज वाटप, वृक्ष वाटप व शहरातील तिरंगा पदयात्रेला व नागरिकांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून 75 लिटर चहा वाटण्यात आला.
कार्यक्रमाच्या नियोजना साठी यांनी केले परिश्रम अ.भा.विद्यार्थी परिषद जिल्हा संघटक प्रसाद सर , भारतीय शाकाहार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन जैन गौसेवा परिवार तर्फे रोहित महाले विशाल ठाकूर वीरेंद्र तुरकेले, प्रवीण , पाटील, हर्षल पाटील, लोकेंद्र बगले, तुषार जाधव ,तसेच इतर पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
तिरंगा रॅलीच्या आयोजकांकडून व सर्व देश प्रेमी बांधवांकडून शहरातील नाहटा चौक स्थित शहीद स्मारक येथे देशप्रेम आणि देशभक्ती च्या घोषणा देत भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
यापुढेही देशभक्ती व देश स्वाभिमानासाठी असलेले कोणतेही कार्य करण्याकरिता व कार्यक्रम राबवण्याकरिता सर्व देशप्रेमी बांधवांनी व शहरातील तमाम नागरिकांनी याचप्रमाणे एकत्र यावे आणि आपले अनमोल सहकार्य द्यावे असे मनोगत आयोजकांकडून व्यक्त करण्यात आले.


