भुसावळमध्ये पाचवी राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धत राजस्थानचा संघ विजयी तर ताप्ती पब्लिक स्कूल उपविजेता.


भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या वतीने ९,१० ऑगस्ट दरम्यान पाचवी राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात झाली. यात महाराष्ट्रासह राज्यस्थान सह जळगाव व भुसावळ येथील सीबीएसई शाळाची
टीम सहभागी झाली होती,स्पर्धेत १७ वर्षांखालील स्पर्धक सहभागी होते. स्पर्धेचे आयोजन हे ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ यांनी केले होते. सर्व संघ ८ रोजी भुसावळमध्ये दाखल झाले होते, त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय ताप्ती पब्लिक स्कूल ने केली होती.
दि१० रोजी ताप्ती पब्लिक स्कूल व राजस्थान येथील सहा सतनाम गर्ल्स हायस्कूल यांच्यात फायनल सामना रंगला यात प्रथम ताप्ती पब्लिक स्कूल ने पहिला गोल मारला व नंतर राजस्थान येथील सतनाम स्कूलच्या विद्यार्थीनींनी दुसरा गोल मारला. शेवटच्या क्षणात राजस्थानचे टीमने त्यांचा शेवटचा गोल मारून विजय प्राप्त केले.राजस्थान येथील श्री गुरुसर मोडीया शा सतनामजी गर्स स्कुल दोन एकने विजयी झाले, तर ताप्ती पब्लिक स्कूल चा संघ उपयोगिता झाला.त्यांना जवाहर नवोदय शाळेचे प्राचार्य डॉ.आर.आर. खंडारे,ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिंसीपल निना कटलर, भोपाल येथील प्रेम सिंग यांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
राजस्थानचा संघ भारावला.
आजचा फुटबॉल मॅच चा फायनल स्कूल व राजस्थान यांच्या त झाला हा सामना इतका अटीतटीचा झाला की राजस्थानचा संघाला सामना जिंकल्यावर अश्रू अनावर झाले. एकमेकांच्या मिठीत पडून ते रडले.त्यांनी ताप्ती पब्लिक स्कूल चे चांगल्या नियोजनाबद्दल आभार मानले.
स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक गोपाल जोनवाल,अर्जुन सनस,विजय संकट, डॅनियल पवार, अकबरखान,पंकज तिवारी,सोनी बेनीवाल आदीनी परिश्रम घेतले.