भुसावळ – रेल कामगार सेना भुसावळ मंडळातर्फे 9 ऑगस्ट जागतिक क्रांति दिनानिमित् भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालय येथे क्रन्तिकारी आंदोलन करण्यात आले. यावेळेस पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. रेल्वे प्रशासनातर्फे कामगारावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे.या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांति दिनाचे औचित्य साधून क्रन्तिकारी आंदोलन करण्यात आले.यावेळेस जय भवानी जय शिवाजीच्या घोषणानी परिसर दुमदमुन गेला होता.
भगव्या झेड्यानी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळेस विविध ज्वलंत व प्रलंबित मांगन्याचे निवेदन एडीआरएम मीणा यांना रेल कामगार तर्फे ललितकुमार मुथा, प्रीतम टाक,योगेश माली,विनोद वाघे, रामदास आवटे यांचे हस्ते देण्यात आले.यावेळेस सीनिअर डीपीओ एन एस काजी, एपीओ वीरेंद्र वड्नेरे हे अधिकारी उपस्थित होते.
प्रदीप भुसारे,अरविन्द थोरात, कमलाकर बानाईत, महेंद्र भोले, पंकज ठाकरे,रमेश मराठे,सुरेंद्र यादव,गोकुळ महाजन,संजय चौधरी, मोहन राजपूत,राजूसिंग,मोहम्मद रफीक,प्रकाश करसाले,गोपाल बाबू पाटिल,बबलूकुमार,प्रवीण कोली, मुकेश महाजन,शांताराम सपकाले,एम के शहा,संतोष देशमुख, मनोज गावंडे,रमेश भोकरे,मानवेन्द्र वर्मा भरत शर्मा,निरंजन राऊत, दीपक तायडे व इतर कामगार उपस्तित होते.



