रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जनजागृती रॅली


भुसावळ – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहाने साजरा करण्यात येत असून शासनाने ‘हर घर तिरंगा’ अशी घोषणा केलेली आहे, त्याच्या जनजागृती साठी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स तर्फे दि.१३ ऑगस्ट २०२२ रोजी शहरात विद्यार्थी व नागरिकांची जनजागृती रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. ही प्रभातफेरी सकाळी ९ वाजता अष्टभुजा देवी मंदिरापासून जवाहर डेअरी, गांधी चौक मार्गे आपले गजाभाऊ चौकातून बाजारपेठ पोलिस स्टेशन कडून डी. एस. हायस्कूल मध्ये संपणार आहे.
या जनजागृती रॅली चे उदघाटन भुसावळचे उप विभागीय पोलीस अधिकारी मा सोमनाथ वाघचौरे हे रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करतील
या रॅलीमध्ये शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहे.